भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लीक सिबीएसई इग्लिश मिडीयम स्कुल मध्ये स्वामी विवेकानंद स्मृती (पुण्यतीथी) दिनानिमीत्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रसंगी
स्वामी विवेकानंद यांच्या जिवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्या म्हणाल्या की स्वामी विवेकानंद हे एक भारतीय तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि वेदांत व योग यांचे प्रणेते होते. त्यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. त्यांनी भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा प्रसार पाश्चात्य देशांमध्ये केला. त्यांनी ‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली, ज्याद्वारे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केले जाते असे ही त्या म्हणाल्या. या वेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
फोटो ओळ – स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना वंदन करताना प्रिन्सिपल निना कटलर ,व्हॉइस प्रिन्सिपल श्रद्धाली घुले,मनप्रीत कौर व विद्यार्थी


