भुसावळात मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा ; कोंडवाडा बनविण्याची केदार सानप यांची मागणी ; मुख्याधिकारी यांना निवेदन ;

भुसावळा (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील जामनेर रोड वर असलेल्या मोकाट जनावरांमुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून प्रसंगी ही गुरे ढोर (जनावरे ) अचानक उधळतात यामुळे अनेक पाडचारी व सायकल स्वार , शाळकरी विद्यार्थी , मोटरसायकल स्वार यांचे अपघात होतात तर वृद्धांचे अतोनात हाल होतात याकरिता पालिका प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन शहरात तात्काळ गुरांचा कोंडवाडा बनवावा अशी मागणी सामाजिक तथा माहीती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी केली असून याबाबत मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना निवेदन दिले आहे .


निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ शहरामध्ये मोकाट जनावरे रोडच्या बाजुला व रोडवर येवून अपघात होत आहेत व रहदारीकरिता सुद्धा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे तात्काळ आपल्या स्तरावरून संबंधितांना योग्य ते आदेश देवून कोंडवाडा बनविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक तथा माहीती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी केली आहे.