भुसावळ (प्रतिनिधी ) – सर्वसामान्य नागरिकांच्या नगरपरिषदेच्या विविध सेवा व योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा त्यांचे प्रश्न व तक्रारी त्वरित निकाली निघावे
यासाठी नगरपरिषद स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर ‘ दि. 26.06.2025 व दि. 27.06.2025 रोजी कार्यालयीन वेळेत (1) मुन्सिपल हायस्कूल जामनेर रोड, भुसावळ (2) डी एस हायस्कूल, यावल रोड भुसावळ (3) नगरपरिषद शाळा क्रमांक 28 खडका रोड, भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेला आहे
तरी नागरिकांनी तिथे उपस्थित राहून योजनेची माहिती करून घ्यावे.
मुख्याधिकारी नगरपरिषद भुसावळ यांच्या आदेशान्वये कळविण्यात आले आहे .



