प्रवाश्यांना दिलासा ; बडनेरा – नाशिक रोड विशेष गाडीच्या कालावधीत वाढ

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे बडनेरा – नाशिक रोड विशेष गाडीचा कालावधीत वाढ करणार आहे:

गाडी क्रमांक 01211 बडनेरा – नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष, पूर्वी 30.06.2025 पर्यंत चालवण्याची सूचना होती, ती आता 01.07.2025 ते 30.09.2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (92 सेवा)

ट्रेन क्रमांक 01212 नाशिक रोड – बडनेरा जंक्शन अनारक्षित दैनिक विशेष, पूर्वी 30.06.2025 पर्यंत चालवण्याची सूचना होती, ती आता 01.07.2025 ते 30.09.2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (92 सेवा)

वरील गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही प्रशासनाने कळविले आहे . .
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.