पंढरपूरची वारी–श्रद्धेची चालती परंपरा, जिथे लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात. या पवित्र यात्रेला खान्देश आणि दक्षिण गुजरातमधून दरवर्षी हजारो वारकरी सहभागी होतात. त्यांच्या सेवेसाठी, सोयीसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी खासदार स्मिताताई वाघ यांनी घेतलेला महत्त्वपूर्ण पुढाकार आता यशस्वी झाला आहे.

खासदार स्मिताताईंनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्यासोबत तसेच पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांच्याशी वेळोवेळी चर्चा करत ही मागणी प्रभावीपणे मांडली. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना केंद्र सरकारची त्वरित मान्यता मिळाली ही गाडी केवळ प्रवासाचे साधन नसून, भाविकांच्या मनातील विठ्ठल भेटीचा दुवा आहे. विशेषतः वयोवृद्ध, महिला, लहान मुले व युवकांसाठी हा प्रवास आता अधिक सुरक्षित, सुलभ व सन्माननीय ठरणार आहे.
“वारी म्हणजे चालणं नव्हे – ती श्रद्धेची, भक्तीची आणि संस्कृतीची ओळख आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी जीव ओतून मार्गस्थ होतात. त्यांच्या सेवेसाठी ‘उधना – पंढरपूर’ स्पेशल ट्रेन मिळवणं हे माझं कर्तव्यच होत. ही ट्रेन म्हणजे भाविकांसाठी विठुरायाचं एक वरदानच ठरेल.”
स्पेशल गाडीची माहिती : दिनांक :
गाडी क्र. 09079/09080 – 4 जुलै 2025
गाडी क्र. 09081/09082 – 5 जुलै 2025
पंढरपूरहून परतीचा प्रवास : 5 व 6 जुलै 2025
मार्ग : उधना – नंदुरबार – अमळनेर – धरणगाव – जळगाव – मनमाड – पंढरपूर


