न.पा.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथे शिवसेनेची बैठक संपन्न. !


भुसावळ (प्रतिनिधी ) – शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने नगरपालिका निवडणुका निमित्ताने तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यानुसार पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथे शिवसेनेची बैठक तालुका प्रमुख निलेश महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीत भुसावळ शहरातील २५ वार्डात संपर्क,बैठका घेऊन जनतेच्या समस्यांची माहिती घेऊन काम करण्याचे शिवसैनिकांना आवाहन करण्यात आले. निवडणुकित नवीन कार्यक्षम तरुणांना शिवसेना संधी देणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त करण्यात आले.
या महत्त्वाच्या बैठकीत तालुका प्रमुख निलेश महाजन, उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, मुकेश गुंजाळ माजीनगरसेवक,शरद जयस्वाल,शरद जोहरे , सुनील भोई,रहीम गवळी, गुणवंत पाटील, साळुंखे,आदी पदाधिकारी उपस्थित होते .