एक महिला भक्ती योगाच्या माध्यमातून आध्यात्मिक सुदृढ़ होवून कुटुंबासह समाज स्वास्थ्य उत्तम ठेवू शकते ; भुसावळात भक्ती योगाला महिलांचा उत्स्फूर्त भरघोस प्रतिसाद ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भक्ती योगाच्या माध्यमातून एक महिला आध्यात्मिक सुदृढ़ होवून कुटुंबासह समाज स्वास्थ्य उत्तम ठेवू शकते या संकल्पनेतून भुसावळ मधे पहिल्यांदाच 8 दिवशीय भक्ति योगा या अंतर्गत महिलाचे योग शिबीर घेण्यात आले . या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त व भर भरून प्रतिसाद मिळाला . या शिबिराची सांगता आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे दिवशी 21 जून शनिवार रोजी सकाळी कमल गणपती हॉल येथे झाली .

दिनांक 14 जून पासून महिला व युवतीं साठी सुरू असलेल्या सर्वोच्च भक्ति योगा शिबीराचा समारोप शनिवारी सकाळी 7.30 वाजता ho झाली .
2015 पासून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 21 जून च्या अंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून महिला व युवतीं च्या सर्वोच्च आरोग्य साध्य ज्यामधे शारीरिक व्यायाम, प्राणायाम वेग आसान एका आध्यात्मिक संगीत व आध्यात्मिक मॉडर्न भक्ति योगा बद्द्ल मार्गदर्शन सोबत मंत्रा मेडिटेशन..इस्कॉन भुसावळ तर्फे घेण्यात आला .

यावेळी योग म्हणजे मिलन…शरीर मन बुद्धि अहंकार जे निसर्गाच्या एकरूप होवून एकमेकां मधील द्वेष भावना विसरून एक जीव तत्त्व या रूपात सगळ्यांनी एकरूप होवून.. योग साधणे..परमेश्वरा च्या तत्त्वाशी एकरूप होणे होय. कलियुग व आजच्या धकाधकीच्या दुनियेत महिला ज्या कुटुंबामधे मुख्य आधार स्तंभ असूनही त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते..एक महिला स्वास्थ्य त्यातून ती भक्ति योगाच्या माध्यमातून ,आध्यात्मिक सुदृढ़ असेल तर एक कुटुंब, समाज स्वस्थ्य ठेवू शकते
यामधे रोज 100 महिला व 25 युवतीनीं सहभाग नोंदवलेला
यामधे झुंबा म्युजिकल व्यायाम पारुल वर्मा यांनी शिकवले, प्राणायाम व आसणे योगा योगा टीचर कीर्ती दाभाडे व भक्ति योगा मंत्र मेडिटेशन डॉ रेखा पाटील यांनी घेतला

शिबिरामध्ये 125 महिला व युवतींनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला शुक्रवारी त्यांच्या इंटर ग्रुप स्पर्धा घेवून विजेत्या घोषित करून शनिवारी बक्षिसे समारंभ करून .ही योगा सवय कायम स्वरूपी प्रत्येकाच्या जीवनात नित्य नियमाने सुरू ठेवून जीवनाचे उच्चतम ध्येय साधणे व सदा आनंदी जिवन जगणे..

21 तारखेला अमेरिकीतूंन डॉ सुप्रिया खरे या खास स्त्रियांना मोटिवेशन मार्गदर्शन करणार आहेत..सर्वांसाठी महा प्रसाद आयोजित केले आहे