भुसावळात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त गरिब विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तू वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळात शिवसेना वर्धापन दिन (उबाठा ) च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त गरिब विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तू वाटप करण्यात आल्या .

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 59 वां र्धापदिनानिमित्त ८० टक्के राजकारण व २० टक्के समाजकारण या नुसार पक्ष प्रमूख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रेरणेने व शिवसेना नेते संजय राऊत , उप नेते संजय सावंत , उप नेते गुलाब वाघ, जील्हा प्रमूख दिपक सिंग राजपूत , विधानसभा संपर्क प्रमुख संजय गोवेकर यांचे प्रमुख मार्गदर्शनात भुसावळ तालुका व शहरात शिवसेना वर्धापदिनानिमित्त साजरा करण्यात आला .

यानिमित्त भुसावळ शहरात जाम मोहल्ला भागात उप तालुका प्रमूख रहीम भाई गवळी यांचे संपर्क कार्यालयात गोरं गरिब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप करण्यात आल्या. प्रसंगी तालुका प्रमूख निलेश महाजन, उप तालुका प्रमूख रहीम भाई गवळी , शिवसैनिक मकबूल मेंबर, अब्बास शेख, गोलू गवळी,।व इतर शिवसैनिक उपस्थित होते.