ताप्ती पब्लीक स्कुलमध्ये योग दिन साजरा;


भुसावळ (प्रतिनिधी )- येथिल ताप्ती पब्लीक सीबीएसई इग्लीश मिडीयम स्कुल मध्ये दि २१ रोजी योगा दिन व योगा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये दि. १७ ते दि २१ पर्यंत योग सप्ताह साजरा करण्यात आला.इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी योगाचे आसन प्राणायामचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योग तसेच चित्रकला स्पर्धा राबविण्यात आले. तसेच इयत्ता आठवी ते नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
त्यानंतर आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर ,व्हाईस प्रिन्सिपल मनाप्रित कौर ,श्रद्धाली घुले,शिक्षिका सोनाली मुजुमदार,योगशिक्षिका अनघा पाटील,वृषाली गाडगीळ यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी यांनी योग सादर केली व प्राणायाम केले.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथिल ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये योग दिना निमीत्त योगाचे विवीध आसने करतांना प्रिंसीपल निना कटलर सोबत शिक्षीका.