भुसावळ – आपल्या सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१ जून २०२५ रोजी, शनिवार, सायंकाळी ७. वाजता प्रभाकर हॉल, भुसावळ येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.

या विशेष प्रसंगी प. पू. श्री. जनार्दन हरीजी महाराज यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या पावन हस्ते मान्यवर सत्कार करण्यात येणार आहेत. उपस्थितांना त्यांच्या आशीर्वचनांचाही लाभ मिळणार आहे.
रोटरी रेलसिटी परिवाराने गेल्या काही वर्षांपासून भुसावळ शहरात आणि परिसरात अनेक उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये ‘भुसावळ प्राईड अॅवार्ड’, पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा, तसेच ३०००० मुला-मुलींना ‘Good Touch Bad Touch’ या महत्वाच्या विषयावर प्रशिक्षण देणाऱ्या डॉक्टर्सचा सत्कार करण्यात आला होता. याचबरोबर रोटरी कुटुंबातील मा. ना. रो. संजयजी सावकारे यांचा पारिवारिक सत्कार देखील करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचे अध्यक्ष रो. विशाल शहा, सचिव रो. अनिल सहानी, आणि प्रोजेक्ट चेअरमन रो. महेंद्र (सोनू) मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे .


