नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

, नाशिक – नाशिक शहरात पोलीस आयुक्तालय हद्दीत 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दि.19 जून 2025, गुरुवार रोजी सायंकाळी आदेशवं दिले .
त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड हे अंबड पोलीस ठाणे येथे प्रभारीभद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र रघुनाथ पाटील हे पंचवटी पोलीस ठाणे येथे प्रभारी , अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश आनंदराव चौधरी हे भद्रकाली पोलिस ठाणे येथे प्रभारी, , उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र भीमराव सपकाळे हे नाशिकरोड पोलीस ठाणे येथे प्रभारी , देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत भारत शिरसाट हे उपनगर पोलीस ठाणे येथे प्रभारी , चिंचोले पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे हे अंबड पोलीस ठाणे येथे दुय्यम, , सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील हे चिंचोळे पोलीस चौकी येथे प्रभारी, , नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक संजय मारुती पिसे हे आडगाव पोलीस ठाणे येथे प्रभारी, , आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन मुरलीधर खैरनार हे अंबड पोलीस ठाणे येथे दुय्यय , भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास भगवान देशमुख हे देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे प्रभारी, , नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक उत्तमराव गिरी हे सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दुय्यम पोलीस निरीक्षक पदी बदली. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे हे अजून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असून त्यांना नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले आहे.