अमळनेर बसस्थानकावर पिस्टलासह दोघांना अटक –

अमळनेर – अमळनेर बसस्थानकावर पिस्टल बाळगणार्‍या दोघांना अटक करण्यात आली.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की, बसस्थानक परिसरात दोन तरुण पिस्तूल घेऊन फिरत आहेत. त्यांनी लगेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस जितेंद्र निकुंभे, प्रशांत पाटील, गणेश पाटील, अमोल पाटील, उज्वलकुमार म्हस्के याना बसस्थानकावर आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवले.

पोलिसांना पाहताच पाठीवर बॅग लटकवलले दोन तरुण पळू लागले. पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांच्या मुसक्या आवळल्या. संशयित खेमराज विजय पाटील (23, रा.न्याहळोद, धुळे), रोहित रामकृष्ण अहिरे (23, रा.पातोंडा, ता.अमळनेर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या बॅगची झडती घेतली असता त्यात काळ्या कपड्यात 25 हजार रुपये किंमतीचे बनावट पिस्टल आढळून आले. अमळनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.