रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधा साठी गाडी क्रमांक 14622/14621 फिरोजपूर कॅन्ट जंक्शन – हजूर साहिब नांदेड – फिरोजपूर कॅन्ट जंक्शन दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी विवरण पुढील प्रमाणे

गाडी संख्या 14621 साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 15 जून 2025 रोजी पासून प्रत्येक रविवार रोजी हुजूर साहिब नांदेड येथून 11.50 वाजता सुटेल आणि फिरोजपूर कॅन्ट जंक्शन येथे मंगळवार रोजी 04:30 वाजता पोहोचेल.
गाडी संख्या 14622 साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 13 जून 2025 रोजी पासून प्रत्येक शुक्रवार रोजी फिरोजपुर कॅन्ट जंक्शन येथून 13.25 वाजता सुटेल आणि हुजूर साहिब नांदेड येथे रविवार रोजी 03:30 वाजता पोहोचेल.
थांबे-: पूर्णा, परभणी, सेलू, जालना, औरंगाबाद, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, विदिशा, बिना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कँट, मथुरा, फरीदाबाद, दिल्ली-सफदर जंग, शकूरबस्ती, बहादुरगड, रोहतक, धमतन साहिब, जिंद, जाखल, मानसा, भटिंडा, कोट कपुरा आणि फरीदकोट.
संरचना -: 2 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, 4 तृतीय श्रेणी वातानुकुलीत, 3 तृतीय श्रेणी वातानुकुलीत इकॉनॉमी, 7 स्लीपर, 4 सामान्य द्वितीय श्रेणी व 1 दुसऱ्या श्रेणीच्या सामानवाहू व गार्ड ब्रेक व्हॅन्स आणि 01 बॅटरी कार एकूण 22 कोच.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES अॅप डाउनलोड करा.


