! –
भुसावळ प्रतिनिधी – शहरातील नॉर्थ कॉलनीतील भुसावळ भागात भर दिवसा एक धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे 1 लाख 87 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे .याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक उद्धव डमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी चेतन चंद्रमनी शिंदे (वय 25) हे नॉर्थ कॉलनी, भुसावळ येथे आपल्या वडील, आई व बहिणीसह राहत असून ते संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात लेक्चरर म्हणून काम करतात. मंगळवारी (10 जून) रोजी सकाळी 8 वाजता ते व त्यांचे वडील चंद्रमनी शिंदे कामावर गेले असताना, त्यांची आई व लहान बहीण नेहा या रूटीन तपासणीसाठी रेल्वे हॉस्पिटलला गेल्या होत्या. घराला कुलूप लावून त्या दुपारी 12 वाजता घरा बाहेर गेल्या होत्या दरम्यान, दुपारी 1.30 वाजता परत आल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यावर बेडरूम व किचनमधील कपाटे उघडून सामान अस्ताव्यस्त टाकलेले आढळले.कपाटातील लॉकरमधून 3 तोळे वजनाची काळ्या मण्यांची सोन्याची मंगळसूत्र किमत 75,000) ,1 तोळ्याचा डिझाईन सोन्याचा नेकलेस किमत 25,000) ,1 तोळ्याचे कानातील सोन्याचे झुमके किमत 25,000) ,5 ग्रॅमचे सोन्याचे टॅप्स किमत 12,500) ,4 ग्रॅमची काळ्या मण्यांची पोत किमत 10,000) ,अर्धा किलो वजनाचे चांदीचे कडे-पाटले किमन40,000) या प्रमाणे दागिने चोरीस गेले आहे .एकूण चोरीचा अंदाजे मुद्देमाल रू 1,87,500 चा आहेघटनेची माहिती मिळताच चेतन शिंदे घरी आले व त्वरित पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत.
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पोलिसांकडून श्वानपथक वउ1 ठसेतज्ज्ञांच्या साहाय्याने तपास सुरू असून लवकरच चोरट्यांचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.



