जळगाव,

जळगाव जिल्ह्यात अनेक बालविवाहाच्या घटना उघड होताय. त्यातच पारोळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे.
पारोळा तालूक्यातील एका गावात मुलगी अल्पवयीन असतांना तिच्या वडिलांनी तिचे लग्न ठरविले. त्यांनी तिचे लग्न पारोळा तालुक्यातीच ग्रामीण भागांतील एका तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. लग्नानंतर तिच्या पतीने ती अल्पवयीन आहे असे माहित असतांना देखील तिच्या सोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ती अल्पवयीन मुलगी यातून गर्भवती राहिली.
तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिने ७ जून रोजी एका मुलाला जन्म दिला. प्रसूत झालेली मुलगी ही अल्पवयीन माता असल्याची बाब सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांच्या लक्षात आली. त्यांनी अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात आला असल्याचा प्रकार उघड केला.
डॉक्टरांच्या सतर्कतेने अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आले होते ही बाब उघड झाली. यानंतर माहेर व सासरकडील सहा जणांविरोधात पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


