भुसावळ (प्रतिनिधी ) :शहरातील प्रभाग क्रमांक सातचे उपक्रमशील माजी नगरसेवक तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे व माजी नगरसेविका अनिता सपकाळे यांच्या प्रयत्नातून प्रभागातील 52 बांधकाम कामगारांना भांडी संचाचा लाभ देण्यात आला. भाजपाचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, 5 जून रोजी हा उपक्रम राबवण्यात आला.

कामगारांना मिळवून द्यावा लाभ
कार्यक्रमास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या म्हणाल्या की, शासनातर्फे महिलांच्या विकासासाठी लाडकी बहिण योजना, फ्री शिलाई मशीन त्याचबरोबर गरीब कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारने महाराष्ट्रामधील बांधकाम कामगारासाठी सरकारने मोफत भांडी संच योजना सुरू केली आहे, पात्र लाभार्थींना या योजनेंतर्गत लाभ मिळवून दिला जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी सर्व कामगारांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी यावेळी केले.


