क्षेत्रीय रेल प्रशिक्षण संस्था, भुसावळ येथे अखिल भारतीय हिंदी नाट्योत्सवाचे दुसऱ्या दिवशी आठ नाटकांचे मंचन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी दिनांक ०३.०६.२०२५ पासून मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्था, भुसावळ येथे रेल्वे बोर्ड यांच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर तीन दिवसीय हिंदी नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्योत्सवाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वी. सुगुणा ,निदेशक (राजभाषा), रेल्वे बोर्ड आणि*डॉ. आर. एन. मीणा ,प्राचार्य, क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्था होते. याच संदर्भात श्रीमती अंजू गेरा, सहायक निदेशक (राजभाषा), रेल्वे बोर्ड व श्री अमरीक लाल, उपनिदेशक (राजभाषा), रेल्वे बोर्ड हे देखील उपस्थित होते आणि सर्व नाट्यप्रयोगांची प्रशंसा केली.

या अंतर्गत आज दिनांक ०४.०६.२०२५ रोजी एकूण ८ नाटकांचे मंचन करण्यात आले. या नाटकांची माहिती व त्यातून देण्यात आलेले संदेश खालीलप्रमाणे आहेत:

  1. वन ही जीवन – पर्यावरण व प्राण्यांचे संरक्षण या विषयावर आधारित नाटक. वन्य प्राणी व निसर्ग वाचवण्याचा संदेश देणारी प्रस्तुती.
  2. संत्रास – दहशतवादाचा निषेध करताना आपसी बंधुभावाचा संदेश देणारे नाटक.
  3. अपराधी कोण? – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते बांगला साहित्यिक ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या “ना” या नाटकावर आधारित.
  4. पवित्र पहल – आत्महत्या थांबवून आयुष्य जगण्याचा हेतू शोधण्याचा संदेश देणारे नाटक.
  5. सपनों से आहत – महिलांवर होणाऱ्या अन्याय व त्यांची सामाजिक दुर्दशा यावर आधारित कथानक.
  6. लालच – मोह, माया व लोभ यांचे परिणाम दाखवणारे नाटक.
  7. निर्माता बाप – एक विनोदी नाटक, ज्यामध्ये चांगल्या कलाकारांशी होणाऱ्या भेदभावावर व्यंगात्मक भाष्य.
  8. आंख – पाच दृष्टिहीन व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित नाटक.