गारखेडा नजिक संगीतम ट्रॅव्हल्सची बस उलटली ; अनेक प्रवासी जखमी :

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळहून पुण्याकडे निघालेली संगीतम ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बसअचानक उलटण्याने मोठा अपघात झाला आहे . २ जून रोजी रात्री अंदाजे ९ ते ९:३० च्या दरम्यान जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळ झालेल्या या भीषण अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत , स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गारखेडा परिसरात सध्या रस्त्याचे दुभाजक काँगक्रिटीकरण करण्याचा काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था खड्डेमय असून, याच कारणामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.

बस उलटल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. आ अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबळीब घटनास्थळी त्वरित गावातील नागरिकामी धाव घेतली व तातडीने प्रवाश्याना बाहेर काढून मदत केली तसेच जखमी प्रवाशांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तर काहींना जामनेर व जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसमध्ये नेमके किती प्रवासी होते व कितीजण जखमी झाले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

घटनास्थळी पोलीस व आपत्कालीन सेवा दाखल झाले असून, बचावकार्य सुरू आहे. अपघातानंतर प्रवासी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू आहे