यावल – यावल नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांक प्रभाकर देशपांडे (71) यांचे शनिवारी पहाटे चार वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अधिक खालावताच त्यांना भुसावळातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी तीन वाजता कोर्ट रोडवरील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली.

शहराचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष
शशांकदादा देशपांडे हे 2001 या काळात यावल नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांच्या कार्यकाळात अत्यंत गंभीर बनलेला शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला होता. नगरपरिषदेची नवीन सुसज्ज इमारत ही त्यांच्याच कार्यकाळात बांधण्यात आली. यावल नगरीचे शिल्पकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, पुतण्या, पुतणी, सुन असा परिवार आहे. ते निरामय हॉस्पीटलचे संचालक डॉ.शंतनु देशपांडे यांचे ते काका होत.


