भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील तहसील कार्यालयातील निवडणूक स्ट्राँग रूम वरील पत्रे काही दिवसांपूर्वी बदलविण्यात आले मात्र कोणतीही निविदा अथवा लिलाव प्रक्रिया केली गेली नाही. परंतु तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोणतीही प्रक्रिया न राबविता संगनमताने परस्पर विक्री करून टाकले, याबाबत संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ वामन सानप यांनी दि.15 मे 2025 रोजी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे केली होती. या तक्रार अर्जाची दखल घेत प्रांत जितेंद्र पाटील यांनी दि.16 रोजी च्या वृत्तपत्रातील बातमी तसेच श्री.सानप यांच्या तक्रारीबाबत तहसील कार्यालयाकडून उलटटपाली सविस्तर लेखी अहवाल आजच सादर करावा, असे पत्र क्र./आस्थाप/कावि/17/2025 दि.16/05/2025 तहसीलदार यांना पाठविले आहे.



