दीपनगरातील 50 टन राखेची चोरी : नाशिकच्या एकाविरोधात गुन्हा –

भुसावळ (11 मे 2025) : दीपनगर प्रकल्पाच्या 50 टन राखेची चोरी केल्याप्रकरणी नाशिकएच्या एकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर राख चोरी प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. गुरुवार, 8 मे रोजी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला.
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून मोठ्या प्रमाणावर राख काढल्यानंतर ती किन्ही परिसरात साठवण्यात येते मात्र संशयीत आरोपी विजय शिवराम माळी (रा.वडनेर, जि.नाशिक) याने 50 टन राख चोरून नेली. ही घटना गुरुवार, 8 मे रोजी रात्री आठ वाजता घडली आहे. या संदर्भात शुक्रवार, 9 मे रोजी सायंकाळी सात वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात उपकार्यकारी अभियंता माधव केंद्रे यांनी तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी विजय शिवराम माळी यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल कैलास बाविस्कर करीत आहे.