भुसावळातI भव्य “तिरंगा रॅली”

भुसावळ (प्रतिन8धी ) – भारत भूमीवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आपली भारतीय सेना “ऑपरेशन सिंदूर” जोरदारपणे राबवत असून पाकिस्तानला जोरदार धडा शिकवत आहे..

आपल्या भारतीय सैन्याला पाठबळ देण्यासाठी व त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आपण सर्व देशभक्त भुसावळकर नागरिक दिनांक 11 मे 2025 रोजी संध्याकाळी ठीक ५ वाजता भव्य “तिरंगा रॅली” काढणार आहोत तरी सर्व भुसावळकर देशभक्त नागरिक, विविध संघटना, माता-भगिनी यांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने या तिरंगा रॅलीस उपस्थित राहावे असे जाहीर आवहन करण्यात येत आहे..

रॅली अष्टभुजा देवी माता मंदिर, जामनेर रोड, भुसावळ येथून रॅली सुरू होणार असून रॅलीची समाप्ती- महाराणा प्रताप चौक वसंत टॉकीज जवळ येथे होईल. असे आयोजक यांनी कळविले आहे -5