दशनाम गोसावी बहुद्देशीय संस्था भुसावळ सर्वसाधारण सभा संपन्न ;


भुसावळ – भुसावळ परिसरातील तसेच जळगाव धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील दशनाम गोसावी गिरी,पुरी,भारती,सरस्वती,पर्वत, सागर,आरण्य,बन,तीर्थ,आणि आश्रम या दशनाम गोसावी समाजातील सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,वैद्यकीय,समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच समाजात समाजाच्या विकासाला घातक ठरणाऱ्या ज्या रूढी परंपरा आहेत,त्यांना छेद देण्याच्या दृष्टीने भुसावळ येथे दशनाम गोसावी बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आली असून ही संस्था २०१४ पासून कार्यरत आहे. परिसरातील तसेच जिल्ह्यातील दशनाम गोसावी समाजाच्या काही समस्या असतील तर त्या जाणून घेणे,निराकरण करणे,योग्य तो न्यायनिर्वाळा करणे,समाजाच्या मदतीला धावून जाणे हे कार्य कार्यकारी मंडळामार्फत केले जात आहे.दि ३ मे रोजी भुसावळ येथील मोरया मंगल कार्यालयात सकाळी सभेला सुरुवात झाली. दशनाम गोसावी समाजाचे आद्यगुर शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन विजय गोसावी,सुरेश गोस्वामी यांच्या हस्ते करून महाआरती घेण्यात आली.त्यानंतर जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बळी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली देऊन सभेला सुरुवात झाली.त्यात मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले, एप्रिल २०२५ पर्यंत संस्थेच्या झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली,दशनाम गोसावी समाजातील सामाजिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सर्वांनी भाग घेतला समाजातील वाईट रूढी परंपरा नष्ट करणे विवाह सोहळ्यात खर्च कमी करणे,विवाह वेळेवर लावणे यावर चर्चा करण्यात आली. हे सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.त्यानंतर २०२४ ते २०२९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारणीच्या निवडीच्या संदर्भात प्रवीण गोसावी यांनी असे सुचविले की कार्यकारणीची निवड न करता जुलै महिन्यात समाजाचा मोठा कार्यक्रम घेण्यात यावा त्यात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, समाजातील पदोन्नती झालेल्या नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित करावा त्यात नवीन कार्यकारी निवडावी या मताला सर्वांनी मंजुरी दिली. या सभेस तात्कालीन अध्यक्ष डॉ. ए.डी. गोस्वामी ,सचिव संजय गोसावी,राकेश गोसावी,देविदास गोसावी,देवचंद गोसावी,योगेश गोसावी,राहुल गोसावी,उर्वशी गोसावी,शिवराम गोसावी,विजय गोसावी ,रवींद्र गोसावी,प्रशांत गिरी,उदय गोसावी,किशोर गोसावी,गणेश गोसावी,सचिन गोसावी आदी कार्यकारणीचे सदस्य आणि समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथे दशनाम गोसावी बहुद्देशीय संस्थेच्या सभेत बोलतांना डॉ.ए.डी.गोस्वामी सोबत संजय गोसावी,राकेश गोसावी,देविदास गोसावी,देवचंद गोसावी,योगेश गोसावी,राहुल गोसावी,उर्वशी गोसावी आदी दिसत आहे.