– भुसावळ – जम्मू काश्मिरातील पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील नगरपालिका पथविक्रेता समितीतर्फे मुख्य बाजारातील हॉकर्स झोन सोमवारी शंभर टक्के बंद ठेवण्यात आला. यावेळी पहलगाम हल्ल्यातील मृतांना अप्सरा चौकात श्रध्दांजली वाहण्यात आली तर बाजारातील इतर दुकाने मात्र पूर्ववत सुरु होती.

पथविक्रेता समिती व राष्ट्रीय हॉकर्स संघटनेने बाजारातील आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. या बंदमध्ये फळ विक्रेत्यांनीही प्रतिसाद देवून आपली दुकाने बंद ठेवली. प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले. भुसावळ शहर नगरपालिका पथ विक्रेता समितीचे पदाधिकारी राजू सपकाळे, गोपाळ पुरोहित, उज्जला राजपुत, साजीद बागवान, सागर ठाकूर, मो. आरिफ, समीर बागवान आदींसह सर्व पदाधिकारी व हॉकर्स बांधव उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी मृतांना न्याय देण्यासाठी सडेतोड उत्तर द्यावे, अशा भावनाही यावेळी हॉकर्स बांधवांनी व्यक्त केल्या.


