जळगाव : बऱ्याच ठिकाणी जैन संत-सतीयांना वाहनधारक बेदकारपणे व अतीवेगाने वाहने चालवुन संताचा अपघात करत आहे. शिवाय संत सतीयांना मारहाण करीत आहे. १३ एप्रिलला प. पू. शैलेष मुनिजी, प. पू. मुनीन्द्र मुनि जी,प. पू. बलभद्र मुनिजी हे मध्यप्रदेश जावद विधानसभा मधील सिगोली जवळ कछोला गावात हनुमान मंदिर मध्ये थांबलेले असतांना त्यांच्यावर मारहाण झाली. या घटनेचा सकल जैन संघाकडून निषेध करण्यात आला आहे.

मारहाण करणाऱ्या अराजक तत्वाना कडक शासन व्हावे व अशा घटना थांबाव्यात त्यासाठी गुंडप्रवृतीचा निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, यावेळी सुशील बाफणा, स्वरूप लुंकड, यांनी झालेल्या हल्याची माहीती देऊन निषेध व्यक्त केला.
यावेळी प्रदीप रायसोनी, पारसमल टाटीया, राजकुमार सेठीया, पवन शामसुखा, नयन शहा, कांतीलाल कोठारी, महावीर बोथरा, राजु दोशी, राजेश जैन, अमर जैन, डॉ सुनील नहाटा, राजु दोशी, प्रदीप जैन, पंकज जैन, महीपाल बोरा प्रविण छाजेड, रूपेश लुंकड, अर्पूवा राका, देवानंदा साखंला, उपा कोठारी, वर्षा समदडीया व बरेच नागरीक व महीला उपस्थित होते. तसेच मुक्ताईनगर येथुन निरज लोढा व जैन समाजाचे पदाधीकारी उपस्थित होते.


