अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी –

अयोध्या ,- देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचा ई मेल आल्याने खळबळ उडाली आहे. ट्रस्टचे अकाउंट ऑफिसर महेश कुमार यांनी मंगळवारी सायबर सेलमध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

सोमवार, 14 रोजी रात्री राम जन्मभूमी ट्रस्टकडून एक ई-मेल आला असून त्यात मंदिराची सुरक्षा वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

धमकी मिळाल्यानंतर, जन्मस्थान संकुल आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा दलांची गस्त वाढवण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक देखरेख प्रणाली अधिक सक्रिय करण्यात आली आहे. पोलिसांनी मंदिराजवळ शोध मोहीम राबवली.

त्याच वेळी, बाराबंकी, चंदौली आणि अलीगढसह अनेक जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांनाही धमकीचे ई-मेल आले आहेत. यामध्ये डीएम कार्यालयावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. हे सर्व मेल तामिळनाडूहून पाठवण्यात आले आहेत.