भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान व पी ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय मिनी गोल्फ स्पर्धा चे उद्घाटन संस्थेचे सचिव विष्णूभाऊ चौधरी यांचे हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. व्हि. पाटील तसेच आंतर विद्याशाखेचे फॅकल्टी मेंबर प्रा डॉ संजय चौधरी, क्रीडा मंडळ सदस्य प्रा डॉ राहुल ठाकूर, उपप्राचार्य डॉ दीपक पाटील तसेच निवड समिती सदस्य उपस्थित होते
या विभागीय स्पर्धेत जळगांव, धुळे, एरंडोल, नंदुरबार संघातील 136 मुले,मुली यांनी सहभाग नोंदविला
या स्पर्धा मध्ये विजयी संघाना पारितोषिक देण्यात आले
या पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमामध्ये विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ दिनेश पाटील, क्रीडा मंडळ सदस्य प्रा डॉ श्रीकृष्ण बेलोरकर यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी निवड समिती सदस्य प्रा डॉ नितीन वाळके, प्रा डॉ शैलेश पाटील, प्रा डॉ संजय भावसार, प्रा डॉ विजय पाटील, प्रा डॉ नवनीत आसी, प्रा अमोल पाटील, प्रा डॉ निलिमा पाटील, प्रा अमर हटकर, प्रा अख्तर खान, उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ आनंद उपाध्याय यांनी केले
मुले व मुली -निकाल
प्रथम क्रमांक – जळगांव विभाग
द्वितीय क्रमांक – एरंडोल विभाग
तृतीय क्रमांक – धुळे विभाग
सदर स्पर्धेतील निवड झालेले खेळाडू अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धा, जे जे टी यू विद्यापीठ झुनझुनू राजस्थान येथे 23- ते 26 एप्रिल 2025 दरम्यान होणार आहेत पंच म्हणून कृपाल ठाकूर यांनी काम पाहिले
सदर स्पर्धा आयोजन साठी प्राचार्य एस. व्ही. पाटील, प्रा डॉ आनंद उपाध्याय, प्रा डॉ अख्तर खान, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहकार्य केले




