भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ रेल्वे विभागाने विभागीय निवड प्रक्रियेद्वारे 112 सहाय्यक लोको पायलट पदांची यशस्वी भरती केली आहे. ही भरती 2019 पासून रिक्त असलेल्या लोको रनिंग श्रेणीतील जागा भरण्यासाठी ही प्रक्रिया उत्कृष्ट ठरली असून भरती विक्रमी वेळेत पूर्ण करणारा भुसावळ हा देशातील पहिला विभाग ठरला आहे.

प्रारंभी, टीआरएस विभागातील तंत्रज्ञांकरिता मर्यादित पात्रतेमुळे फक्त दोन उमेदवारांची निवड होत होती. मात्र, रेल्वे बोर्डाने 8 एप्रिल 2024 रोजी एक विशेष सवलत जाहीर केली, ज्यामुळे इतर सर्व विभागातील पात्र कर्मचारी अर्ज करू शकले. त्यानंतर 16 मे 2024 रोजी 173 पदांसाठी नवीन अधिसूचना जारी झाली. 923 उमेदवारांची नोंदणी; 112 जणांची अंतिम नियुक्ती लेखी, वैद्यकीय व मानसशास्त्रीय चाचण्या यशस्वीपणे पार 3 एप्रिल 2025 रोजी नियुक्ती आदेश; 9 एप्रिलला स्वागत सत्र या अधिसूचनेला प्रतिसाद देत 923 उमेदवारांनी विविध विभागांमधून अर्ज केले. 28 जुलै 2024 रोजी झालेल्या लेखी परीक्षेत 161 उमेदवार उत्तीर्ण झाले. पुढील वैद्यकीय तपासणी व 23-26 सप्टेंबर दरम्यान मानसशास्त्रीय चाचण्या पार केल्यानंतर 131 उमेदवारांना भुसावळ प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आले.
3 ऑक्टोबर 2024 ते 1 एप्रिल 2025 या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, 3 एप्रिल 2025 रोजी 112 पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. 9 एप्रिलला भुसावळ मंडळ प्रशिक्षण केंद्रात स्वागत व प्रेरणासत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये डीआरएम श्रीमती इति पांडे, एडीआरएम सुनील कुमार सुमन आदी मान्यवर उपस्थित होते. रेल्वेच्या गुणवत्तापूर्ण सेवेचे उदाहरण
कर्मचारी भरतीतील नियोजनशीलता आणि कार्यक्षमतेचा उत्तम नमुना यात्रेकरू सेवेत सुधारणा व सुरळीत संचालनास चालना ही भरती केवळ रिक्त जागा भरण्यापुरती मर्यादित नसून, भुसावळ मंडळाच्या नियोजनशीलता, कार्यक्षमता आणि सेवाभावाचे प्रतीक ठरली आहे. लोको रनिंग विभागातील कमतरता दूर झाल्याने आता रेल्वे संचालन अधिक सुसंगत आणि सुरक्षित होईल. ही उपलब्धी रेल्वेच्या कार्यक्षमता वृद्धीसह प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी भुसावळ विभागाच्या कटिबद्धतेची साक्ष देते.


