श्रीराम नवमीला केंद्रीय क्रीडामंत्री श्रीमती रक्षाताई खडसेंची गोमाता सेवा केंद्राला भेट ; गोसेवकांना गोसेवेसाठी दिले सहकार्याचे आश्वासन ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील प्रभु श्रीराम नवमी निमित्त श्रीसाईबाबा मंदीर पालखी सोभु श्रीरामजी दर्शन झाल्यानंतर जामनेर रोड वरील श्री संत गजानन महाराज मंदिर समोरील गोसेवा केंद्र याठिकाणी देखील भेट दिली या गोसेवा केंद्रात कत्तली पासुन वाचविलेल्या व जखमी गो मातेच्या रक्षण सेवेबरोबर इतर मुक्या जीवांची देखील सेवा उत्कृष्ट प्रकारे होते याची खा खडसे यांनी दखल घेतली

गोभक्त मुन्ना बेहरा यांनी सांगितले की रोहित महाले व गोसेवक पुर्णवेळ गोरक्षणांचे कार्य निस्वार्थी भावनेने करीत आहे मात्र संस्था नसून आर्थिक क्षमता नाही महाले या गोसेवकाने 3 वर्षे पादत्राणे सोडले होते गोरक्षणांची तळमळ बघत गोभक्त योगेश पाटील यांनी खाजगी जागा अपघात ग्रस्त गोमातेच्या उपचारा साठी दिली

गोमाता व मुक्या जीवांच्या कल्याणासाठी संस्था करायची आहे तसेच भविष्य काळात मुक्या जीवांसाठी दवाखाना उघडण्याचे स्वप्नं आहे जेणेकरून प्रत्येक जखमी गंभीर आजारी जीवांचे प्राण वाचतीलअसे गोसेवक महाले यांनी सांगितले या पवित्र कार्याचे खा रक्षाताई यांनी कौतुक करीत सदैव गोसेवा कार्यात सोबत असल्याची ग्वाही दिली

यावेळी क्रीडामंत्री श्रीमती रक्षाताई खडसे साईसेवक पिन्टुभाऊ कोठारी श्री मुन्ना बेहरा श्री विनोद चोरडीया हर्षल सपकाळे अनिरुद्ध कुलकर्णी रोहित महाले व समस्त गोसेवक बांधव उपस्थित होते