बडनेरा ते कुरुम स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक : अमरावती व वर्धा मेमू रद्द –

भुसावळ (प्रतिनिधी) : बडनेरा-शेगाव खंडातील बडनेरा ते कुरुम स्थानकांदरम्यान अप व डाउन लाईनवर स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी दि. 3 एप्रिलला (गुरुवारी) विशेष ब्लॉक घेतला आहे.

याचा गाड्यांवर परिणाम होणार आहे, 3 एप्रिलला काही गाड्या रद्द करण्यात येतील. यामध्ये बडनेरा ते अमरावती मेमू, अमरावती ते वर्धा मेमू, वर्धा ते अमरावती मेमू आणि अमरावती ते बडनेरा मेमू या गाड्यांचा समावेश आहे.तसेच, काही गाड्यांच्या वेळांमध्ये बदल होईल. नरखेड ते बडनेरा मेमू ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा नरखेड येथून 90 मिनिटे उशिरा सुटेल. तर बडनेरा ते भुसावळ मेमू ही गाडी बडनेरा येथून 90 मिनिटे उशिरा सुटेल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.