भुसावळ (प्रतिनिधी – भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 22 मध्ये प्रचंड प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यामुळे संपूर्ण नागरिक त्रस्त आहेत . लोकांना घराबाहेर सुद्धा वावरण कठीण झालेले आहे. रहिवाशांच्या आरोग्यास प्रचंड धोका निर्माण झालेला आहे.भुसावळ नगरपालिकेच्या धुर फवारणी यंत्रणा सुद्धा या डासांचा उपद्रव रोखण्यास अपयशी ठरलेली आहे .या प्रभागात संतोषी माता हॉलच्या मागून हॉटेल सुहास पर्यंत जाणारा मोठा नाला आहे . तसेच इतरही नाले आहेत. सफाई करताना फक्त या नाल्यांची वरवर सफाई करण्यात आलेली होती . या प्रभागात डासांची उत्पत्तीचे प्रमाण हजारोंच्या पटीने दिवसेंदिवस वाढत आहे . या प्रभागात एक दिवसाआड रसायन आणि धुर फवारणी , पावडर फवारणी होणे अत्यंत गरजेचे असून तातडीने या प्रभागात डासांच्या उपद्रव रोखण्यासाठी व यापासून निर्माण होणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी संपूर्ण प्रभागाचे आरोग्य आणि स्वच्छता विभागाकडून सर्वेक्षण करण्यात यावे. व त्वरित या ठिकाणी यांबाबत उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा या प्रभागास मच्छर ग्रस्त प्रभाग घोषित करण्यात यावा तसेच याविरुद्ध त्वरित उपाययोजना न झाल्यास भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना घेराव घालणार असल्याच भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना तक्रार केलेली असल्याचं त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविलेले आहे.
शिशिर जावळे
प्रदेश सचिव भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रभाग क्रमांक 22 कस्तुरी नगर भुसावळ जिल्हा जळगाव



