ईसेवा केंद्र चालकांमध्ये खळबळ ; राज्यसेवा आयुक्तांनी घेतली ईसेवा केंद्राच्या तक्रारीची दखल ; जिल्हाधिकार्‍यांना दिले चौकशीचे आदेश ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी राज्यसेवा आयुक्तांकडे केलेल्या ईसेवा केंद्राच्या तक्रारीची दखल कक्ष अधिकारी राज्यसेवा आयुक्त नाशिक उदय काण्णवयांनी घेतली असून याबाबत जिल्हाधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिल्याने ईसेवा केंद्र चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे . जिल्हाधिकारी यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

नाशिक येथील राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुळकर्णी या जिल्हा दौर्‍यावर असतांना भुसावळ तालुक्यातील शासकिय कार्यालये तसेच ई सेवा केंद्र यासह इतर ठिकाणी फलक लावणे व कामकाजाबाबत आढावा बैठकीसाठी आलेल्या असतांना तक्रारदार केदारनाथ सानप यांनी भेट घेवून ई सेवा केंद्रावर नागरिकांच्या होणार्‍या फसवणूकीबाबत निवेदन दिले होते. या तक्रारीची दखल घेत कक्ष अधिकारी राज्यसेवा आयुक्त नाशिक उदय काण्णव यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र क्र. 0325/कावि-290/अपिल 407 अन्वये दि.25-3-25 रोजीच्या पत्रान्वये विषयांकित प्रकरणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप रा.हुडको कॉलनी यांना संदर्भीय तक्रार अर्जाची प्रत सह पत्रासोबत जोडली आहे. तसेच या प्रकरणी यथोचित कारवाई करून तक्रारदारास आपल्या कार्यालय स्तरावरून परस्पर कळविण्यात यावे असे पत्र कक्ष अधिकारी उदय काण्णव यांनी दिले आहे.