हरी विठ्ठल नगर जळगाव, येथे दहा दिवसीय महिला धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर संपन्न ;

जळगाव:- येथे भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व अंतर्गत तालुका महिला शाखा जळगाव अंतर्गत जळगाव महिला शहर शाखा विद्यमाने हरी विठ्ठल नगर जळगाव येथे आयोजित १० दिवसीय महिला धम्म उपासीका प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारोह दि. २८/३/२०२५ रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आद. वैशालीताई सरदार (जिल्हा सरचिटणीस जळगाव) या होत्या. सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमांचे पुष्प अर्पण करून दीप, धूप, पूजन करण्यात आले. सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले त्यानंतर शिबिरार्थी उपासिकानी आपले मनोगत व्यक्त केले.नंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले यामध्ये प्रमुख मार्गदर्शिका आद. सुनिता ताई वानखेडे(जेष्ठ केंर्दिय शिक्षिका), जिल्हा संस्कार सचिव र्पितीलाल पवार , तालुका अध्यक्ष राजेश इंगळे. सुमित्रा सरवटकर (जेष्ठ केंर्दिय शिक्षिका) तसेच अशोक सरवटकर, प्रकाश सरदार यांनी महिलांना मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी ग्राम शाखेचे पदाधिकारी आणि जळगाव येथील धम्म उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्षा आद. वैशाली सरदार जिल्हा सरचिटणीस यांनी अध्यक्ष भाषण केले. मान्यवरांच्या हस्ते उपासीकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन जळगाव शहर अध्यक्षा .प्रज्ञाताई जवरे यांनी केले.
आभार प्रदर्शन जिल्हा पर्यटन सचिव विद्याताई झनके यांनी केले .