पाडळसे ग्रामपंचायत कर्मचारी पुर्व सुचना न देता पुन्हा संपावर ;



यावल (वा ) – तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा एकदा संप पुकारला असुन.या संपामुळे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या विविध कामांवर मोठा परिणाम होत असून ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी हे कर्मचारी संप करत असले तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या पगाराचे नियोजन केले जात नाही परिणामी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही विशेष म्हणजे,संपावर असूनही काही कर्मचारी मात्र वसुलीचे काम करीत असल्याचे दिसून येतं आहे . गावाची सुरक्षा धोक्यात
ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वित्त आयोगाच्या निधीतून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत आहेत. हे कॅमेरे कार्यरत नसल्याने गावाच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरी, गैरप्रकार यांसारख्या घटनांवर नजर ठेवणे कठीण झाले असून, ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
ग्रामस्थांचा संताप, प्रशासनास इशारा
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना करून कर्मचाऱ्यांचे पगार आणि सुरक्षा व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी केली जात आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.