डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत अध्यक्षपदी लोखंडे तर उपाध्यक्षपदी तायडे


भुसावळ, (प्रतिनिधी ) शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस जवळ असलेल्या कवाडे नगर येथील बौद्ध विहारात भारतरत्न डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये वार्डातील जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली. सर्वानुमते अध्यक्षपदी सुभाष पांडुरंग लोखंडे यांची तर उपाध्यक्षपदी विलास तायडे, सचिव पदी प्रदीप गायकवाड उपसचिव पदी जगदेव तायडे, खजिनदार पदी विनोद त्रिमूर्ती, कार्याध्यक्ष पदी सिद्धांत साळवे, दिलीप सोनवणे, किशोर बाविस्कर यांची निवड करण्यात आली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भुसावळ शहर समितीचे माजी अध्यक्ष गणेश सपकाळे वाल्मीक देहाडे, बबलू नेतकर, अण्णा शिंदे, संगीत खरे, सोनु नेतकर, दीपक म्यांद्रे, निरंजना तायडे मनोज बाविस्कर पवन रोकडे, विजय बाहे, तसेच महामाया प्रजापती महिला मंडळाच्या अध्यक्षा पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते . सुभाष लोखंडे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष पदी विलास तायडे व समितीच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड झाल्यानंतर कवाडे नगर वार्डातील बौद्ध उपासक उपासिकांनी सुभाष लोखंडे, विलास तायडे यांच्या गळ्यात पुष्पहार टाकून त्यांचे स्वागत केले. यावेळी सुभाष लोखंडे यांनी सांगितले की वार्डातील बौद्ध बांधवांनी माझी ज्या विश्वासाने अध्यक्षपदी निवड केली आहे. तो सार्थ ठरवून वार्डात विविध सामाजिक उपक्रम राबवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल.