फुलगाव येथील अंगणवाडी मदतनीस भरतीमध्ये अपहाराची सखोल चौकशी होऊन कारवाई व्हावी – केदारनाथ सानप

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण यांनी रिक्त अंगणवाडी मदतनीस भरतीमध्ये पात्र उमेदवारांचे कागदपत्रांचे कुठलेही अवलोकन न करता आर्थिक देवाण घेवाण करून भरती झाली असून सदर प्रकरणी संबंधित एकात्मिक बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली आहे .

याबाबत श्री सानप यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी मिनल करणवाल यांची भेट घेवून त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण यांनी रिक्त अंगणवाडी मदतनीस भरतीमध्ये पात्र उमेदवारांचे कागदपत्रांचे कुठलेही अवलोकन न करता आर्थिक देवाण घेवाण करून केलेला अपहारामुळे संबंधित एकात्मिक बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी व झालेल्या कारवाईची एक प्रत माहितीस्तव सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांना देण्यात यावी अशी मागणी श्री.सानप यांनी केली आहे.