पारोळ्यानजीक म्हसवे शिवारातील बायपासजवळ अपघातात दोन गंभीर ;

पारोळा —
पारोळ्याजवळ बायपासवर म्हसवे शिवारात मोटरसायकलवरील दोन जणांना कारने उडवल्याने त्यात ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की पारोळ्याजवळ महस्वे गावाजवळ दि. ६ रोजी दुपारी मोटारसायकलला कार ने धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्या दोघांवर पारोळा कुटीर रुग्णालय येथे प्रथम उपचार करून धुळे येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील शहरातून बाहेर गेलेल्या बायपास वर म्हसवे शिवारात एका कारने मोटरसायकलला मागाहून धडक दिलीआहे.त्यात मोटरसायकल वरील राहुलकैलास बारेला वय २८ व सुनील जुरा उर्फ भुऱ्या पावरा वय २६ दोघं राहणार मध्य प्रदेश हल्ली मुक्काम म्हसवे तालुका पारोळा हे गंभीर जखमी झाले तर कार मध्ये एअर बॅग उघडल्याने कार मधील दोघे वाचले

जखमींना घटनास्थळावरून आशुतोष शेलार, प्रसाद राजहंस, यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले घटनास्थळी स्थानिकासह पारोळा पोलीसांनी धाव घेत बचाव कार्य केले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली सदरदोघे गंभीर जखमींवर पारोळा येथील डॉक्टर प्रशांत रनाडे, डॉक्टर सुनील पारोचे, डॉक्टर गिरीश जोशी,यांनी प्रथमोपचार करून त्यांना महामार्गाची रुग्णवाहिकेतून पुढील उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली अपघात घडल्यानंतर पारोळा कुटीर रुग्णालयात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.