रमजान सणाबाबत भुसावळ पोलीस ठाण्यातील बैठकीत चर्चा;

भुसावळ (प्रतिनिधी ) – : मुस्लीम बांधवाच्या रमजान महिन्यानिमित्त भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत समाजबांधवांशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजान महिना असल्याने मुस्लिम समाजबांधवांची बाजार पेठ पोलिस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी पो. नि. राहुल वाघ यांच्याशी मुस्लिम बांधवांनी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. या वेळी सलीमसेठ चूड़ीवाला, आशिक खान, साबिर शेख, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रजा टावर, पापा मेंबर, इम्तियाज भाई, युसूफ भाई, बागवान, जुनैद खान, बशीर ठेकेदार, निसार भाई झूलेवाले जमील, आर. के. अकबर गवळी, अॅड. जावेद चिराग आदी मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.