भुसावळ (प्रतिनिधी ) –
कोथळी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव महाराष्ट्र येथील एका यात्रोत्सवात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे राज्यमंत्री यांची मुलगी व तिच्या काही मैत्रिणी यांची तेथील टवाळखोर मुलांनी या तरुणींची छेड काढली . या टवाळखोरांना हटकणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर सुद्धा यांनी हात उगारण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे सदर तरुणी प्रचंड भयभीत झालेल्या आहेत. आधीच महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षितता प्रश्न ऐरणीवर आलेला आहे महिला स्वतःला असुरक्षित समजत आहेत आणि रोजच्या महिला अत्याचाराच्या घटना या समोर येत आहेत. आणि बऱ्याच घटनांमध्ये महिला अत्याचार झाल्यानंतर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यास घाबरतात त्यामुळे अत्याचार करणाऱ्या नराधमांना रान मोकळं होतं आणि पुन्हा त्याच पद्धतीचे अनेक गुन्हे घटना सातत्याने जोर पकडत असताना दिसत आहे,त्यामुळे या प्रकरणामध्ये या सर्वच मुलींची छेडखानी करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व त्यांना साथ देणाऱ्या सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी. या टोळीला या गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी ,तसेच या गुन्हेगारांचे सर्व कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स (सीडीआर )तपासण्यात येऊन ते मीडियामध्ये जाहीर करण्यात यावे. मुक्ताई नगरातील वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार असणाऱ्या पोलीस कर्मचारी अधिकारी यांना त्वरित सेवेतून बडतर्फ करण्यात यावे त्यांची सुद्धा उच्चस्तरी चौकशी करण्यात यावी. व अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महिला सुरक्षा धोरणांची मुक्ताईनगर सह सर्वच ठिकाणी कठोर अंमलबजावणी करण्यात यावी ही समस्त लेवा पाटील समाज भुसावळ जिल्हा जळगाव यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना भुसावळ प्रांत अधिकारी डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. निवेदन देणाऱ्यांमध्ये शिशिर जावळे ,दिलीप चौधरी, दिपक धांडे,एडवोकेट सागर सरोदे ,प्रल्हाद नेहेते , चंद्रकांत पाटील, निलेश फिरके, मुरलीधर लोखंडे किशोर पाटील, शैलजा पाटील , प्रगती पाटील, एडवोकेट सुरज पाटील, सुभाष फाल क, घनश्याम महाजन ,समावेश होता . निवेदनातील मागण्या पूर्ण झाल्यास अन्यथा या विरुद्ध लेवा समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही लेवा समाज प्रतिनिधी यांनी यावेळी दिला.



