भुसावळात मेघालय राज्यातील तरुणीवर अत्याचार –

भुसावळ (प्रतिनिधी ) – मेघालय राज्यातील 18 वर्षीय तरुणीवर शहरात अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मेघालय राज्यातील 18 वर्षीय तरुणीवर एप्रिल 2024 ते 11 मे 2024 दरम्यान संशयीताने येथे वेळोवेळी तरुणीवर विश्वास संपादन करीत अत्याचार केला. तरुणीला नोकरी मिळाली नाही व त्रासाला कंटाळून तिने गुरुवारी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून चेतन व मुन्नी नामक संशयीत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.