भुसावळ पालिकेत दिवंगत कर्मचारी यांच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती

भुसावळ (सा वा ) -भुसावळ नगर परिषदेत दिवंगत कर्मचारी यांच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात आले.

यामध्ये दिवंगत कर्मचारी विजयसिंग शंकरसिंग राजपूत यांचे वारस हर्षा विजयसिंग राजपूत ,प्रमोद दगडू बोरोले यांचे वारस जैमिन प्रमोद बोरोल , धनराज गिरधर वारके यांचे वारस प्रसाद धनराज वारके
यांना जिल्हाधिकारी , यांच्या शिफारशीनुसार अनुकंपा तत्त्वावर मुख्याधिकारी राजेंद्र फातले , यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

यावेळी स्थापत्य अभियंता रितेश बच्छाव, आस्थापना प्रमुख वैभव पवार, उपमुख्यधिकारी शेख परवेज अहमद उपस्थित होते .