भुसावळात शिवजयंती महोत्सवानिमित्त 1 मार्च रोजी पदाधिकारी निवडीसाठी बैठक –

भुसावळ ( प्रतिनिधी) : तिथीनुसार साजर्‍या होणार्‍या शिवजयंती महोत्सवानिमित्त भव्य नियोजन तसेच अन्य पदाधिकारी निवडीसाठी पांडुरंग टॉकीज मागील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात पदाधिकार्‍यांची बैठक शनिवार, 1 मार्च रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आली आहे .

या बैठकीत उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, देखावा समिती, कायदेशीर सल्लागार समिती व अन्य पदाधिकार्‍यांची निवड केली जाणार आहे. सर्व शिवभक्तांनी अवश्य उपस्थिती द्यावी, असे आवाहन कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांनी केले आहे.