जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील सिंधी कॉलनी आणि मास्टर कॉलनी भागातून दोन बुलेट मोटरसायकली लांबविणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी माहिती अशी की , हर्षद दिलीपकुमार नाकपाल यांच्या मालकिची रॉयल ईम्पैक्ट 350 पांढ-या रंगाची बुलेट क्र. MH-19 CH-4898 ही त्यांचे राहते घर बाबा नगर सिंधी कॉलनी चे समोरुन दिनांक 13/11/2024 रोजी रात्री 10.30 वा ते सकाळी 05.45 वा चे सुमारास चोरी केली होती. सदर बाबतीत फिर्यादी यांनी बुलेट मोसा चोरी गेल्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरुन गुन्हा रजि. नंबर 844 / 20245 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
जळगाव जिल्हयामध्ये मोटार सायकली चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी चोरीच्या घटना उघडकिस आणुन आरोपी अटक करणेबाबत मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत पोलीस निरीक्षक संदीप पाटील , यांनी गुन्हे शोधपथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याच्या सुचना केल्या होत्या.
गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोधपथकातील तपासी अंमलदार पोना किशोर पाटील यांनी सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासुन गुन्हा उघडकिस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या,

त्यानुसार गुन्हे शोधपथकातील पोना. योगेश बारी, विकास सातदीवे, पोका नाना तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांनी सतत पाठपुरावा करुन गोपणीय बातमीच्या आधारे संशईत संशयीत आरोपी जावेद शेख चांद, रा मास्टर कॉलनी जळगाव व अदनान अमजद खान रा शाहुनगर जळगाव यांना ताब्यात घेवुन दिनांक 22/02/2025 रोजी अटक केली . . न्यायालय समक्ष पोलीस कस्टडी रीमांड करीता हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली . पोलीस कोठडीत असतांना दोन्ही संशईतांनी रॉयल ईम्पॅक्ट 350 पांढ-या रंगाची बुलेट क्र. MH-19 CH-4898 ही सिंधी कॉलनी बाबा नगर येथून चोरी केल्याची कबुली दिली. अजुन काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता असल्याने आरोपी जावेद शेख चांद याची पुन्हा 02 दिवस वाढीव पोलीस कस्टडी रीमांड घेतली.
रीमांड दरम्यान त्याने पुन्हा एक काळया रंगाची बुलेट ही मास्टर कॉलनी परीसरातुन चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर बुलेट सुध्दा त्याचे कडुन हस्तगत करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एकुण 1,30,000/-रुपये किंमतीच्या दोन बुलेट मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
यांनी केली कारवाई —
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउपनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेका गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, पोना. योगेश बारी, विकास सातदीवे, पोका नाना तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास किशोर पाटील करीत आहेत.


