भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागात रेल्वे विद्युतिकरणाच्या ऐतिहासिक 100 वर्षांच्या पूर्तीनिमित्त दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इती पांडेय यांनी हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनला शुभारंभ केला.

ही वॉकेथॉन विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या प्रांगणातून सुरू होऊन उत्तर दिशा रेल्वे स्थानक, भुसावळपर्यंत आयोजित करण्यात आली. या वॉकेथॉनमध्ये रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) श्री सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) श्री एम. के. मीना यांच्यासह सर्व वरिष्ठ शाखा अधिकारी, अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


