साकेगांव येथे महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा साजरा

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील साकेगांव येथे महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा साजरा करण्यात आला.प्रयागराज येथे १४४ वर्षानंतर होत असलेल्या महाकुंभात जगभरातून करोडो लोकं येत आहेत व त्रिवेणी संगमामध्ये स्नान करत आहेत व समरसतेचा अनुभव घेत आहेत.
या सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक समरसता जोपासली जावी, आम्ही सर्व एकाच आईची मुलं आहोत व त्यानात्याने आम्ही एकमेकांचे बंधु आहोत हा भाव वृद्धिंगत व्हावा असा हेतू आहे.
यासाठी त्या भागातील/गावातील प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी म्हणून एक एक जोडपे व अन्य मंडळी या सोहळ्यात सहभागी व्हावेत असा प्रयत्न केला आहे. या सोहळ्यात एकूण 07 जोडप्यांच्या हस्ते तीर्थकलशाचे पूजन मंत्रोच्चारात करण्यात आले. यावेळी भोई , तेली न्हावी चांभार , सुतार , धनगर , मराठासमाजबांधव उपस्थित होते .