भुसावळ (प्रतिनिधी ) – द बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अरुणाताई इंगळे, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष .सुरेखाताई महिरे , महाराष्ट्र राज्य महिला महासचिव शुभांगी डोंगरे या सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हयातील भुसावळ शहर शाखा महिला कमिटीच्या वतीने दिनांक 24/2/2025 रोजी भागीरथी प्राथमिक विद्यालय भुसावळ येथे गरजू विद्यार्थ्यांना, नुकतीच झालेली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप केले.
सावित्रीमाई जयंतीला प्रत्येकीने एक वही आणि पेन सोबत आणावे असा संकल्प रुजविला होता. त्यावेळेस जमा झालेल्या वह्या आणि पेन तसेच मुलांसाठी खाऊ असे आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आज जाऊन शाळेमध्ये मुलांमध्ये वाटप केले.

यावेळी भुसावळ शहर शाखा महिला अध्यक्ष मंदाकिनी केदारे
यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व थोडक्यात समजावून सांगितले.
कार्यक्रमाला भुसावळ शहर शाखा सचिव मनिषा निकम, कोषाध्यक्ष सरिता नन्नवरे, गुलमोहर ग्राम शाखा महिला अध्यक्ष अनिता तायडे, सचिव शीला गुरुचल, अमरनाथ नगर ग्राम शाखा महिला उपाध्यक्ष रीता तायडे, सल्लागार रेखाताई खेडकर, सदस्य कांता प्रसन्नदर्शी ,यावल तालुका महिला अध्यक्ष मनीषा तायडे, यांनी सुद्धा वह्यांची मदत केली असून यांची विशेष उपस्थिती लाभली .
भागीरथी प्राथमिक शाळा भुसावळ मधील भावना पाटील,सविता वानखेडे, जय माला चौधरी, या शिक्षिका सुद्धा उपस्थित होत्या.



