रयतेचा राजा’ महानाट्याला दीपनगरवासियांचा प्रतिसाद:

भुसावळ, (प्रतिनिधी) दीपनगर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जळगाव येथील शिवरत्न प्रतिष्ठान यांनी सादर केलेल्या रयतेचा राजा या महानाटकाला उदंड प्रतिसाद लाभला. शिवकालीन दरबार, बैलजोडी, घोडे, तोफ आणि रोषणाईने रंगत आली. महानिर्मितीचे संचालक (संचलन) संजय मारुळकर, ईडी विवेक रोकडे, प्रफुल्ल भदाणे, शशांक चव्हाण, हास्य जत्रा फेम हेमंत पाटील, निर्माते जयवर्धन नेवे, रविंद्र सोनकुसरे, मनोहर तायडे, राजेश कुंभार, संतोष वखारे, अशोक भगत, रविंद्र डांगे उपस्थित होते. छत्रपतींचा जन्ममहोत्सव ते राज्यभिषेक सोहळा आदी सादरीकरण

झाले. १४० हौशी कलाकारांनी उत्कृष्ट अभिनयाने मने जिंकली.

उत्सव समितीचे सचिव राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एम. पाटील, अतुल पवार, विकास पाटील आणि समितीचे कोषाध्यक्ष राहुल पाटील, दत्तात्रय शिंदे, दिलीप पाटील, निलेश पिंगळे, अनिकेत सोळसकर, आशुतोष लांबोळे, महेश डोंगरे, नरेंद्र पाटील, बंडू मेकाले, पतंग माने, सचिन नाकाडे, वाल्मीक कवडे, विष्णू धनके, अरुण शिंदे, गुंडाराज बाभळसुरे, श्रीनिवास घोडके, ज्ञानेश्वर धनगर, सोमनाथ लोहकरे आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. दीपनगर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.