महाशिवरात्री निमित्त नुपूर महोत्सवाचे आयोजन ;


भुसावळ – येथील नुपूर कथक डान्स अँकॅडमी च्या वतीने दर वर्षी प्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त शहरात नुपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २६ फेब्रुवारी बुधवार रोजी सायंकाळी सात वाजता शहरातील डॉ. बी. व्ही. खाचणे हॉल येथे होणाऱ्या कार्यक्रमात नुपूर अँकॅडमी चे विद्यार्थी आपल्या नृत्यशिक्षिकांसह कथक नृत्य तर कोलकाता येथील पाहुणे कलाकार श्रीहरी मुजुमदार हे कथकली नृत्य सादर करतील . यंदा या महोत्सवाचे अठ्ठावीसवे वर्ष असून सर्व रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.
मुजुमदार यांना नृत्यश्री पुरस्कार घोषित
या महोत्सवात दर वर्षी राष्ट्रीय पातळीवर शास्त्रीय नृत्य चा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कलावंतास नृत्यश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या वर्षी हा पुरस्कार श्री मुजुमदार यांना घोषित करण्यात आला आहे.