राजभाषा धोरणाच्या अंमलबजावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान ; ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळला पुरस्कार :

भुसावळ, (प्रतिनिधी )-

राजस्थानातील जयपूर येथे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने १७.०२.२०२५ रोजी आयोजित केलेल्या मध्य, पश्चिम आणि उत्तर क्षेत्र चे संयुक्त क्षेत्रिय राजभाषा परिषदेत, पश्चिम क्षेत्र ( ख क्षेत्र ) अंतर्गत ‘ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ’ ला २०२३-२०२४ या वर्षात संघाच्या राजभाषा धोरणाच्या अंमलबजावणीच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल ‘तिसरा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या परिषदेतील पुरस्कार वितरण समारंभात राजस्थानचे माननीय मुख्यमंत्री श्री. भजनलाल शर्मा यांच्या हस्ते ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ चे कार्यकारी निदेशक श्री. निरंजन लाल यांना शिल्ड प्रदान करण्यात आली आणि माननीय केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. नित्यानंद राय यांच्या हस्ते वरिष्ठ अनुवाद अधिकारी श्री. विवेक ओमप्रकाश स्वामी यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या परिषदेत फॅक्टरी चे श्री विरेंद्र वि .उके , कार्य प्रबन्धक तसेज यंत्र इंडिया लिमिटेड मुख्यालय, नागपूर येथील श्री. नरेश गडपाल, सहायक निदेशक ( राजभाषा ) हे देखील उपस्थित होते. या विशेष कामगिरीबद्दल, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे कार्यकारी निदेशक श्री निरंजन लाल यांनी कारखान्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आणि फॅक्टरी च्या राजभाषा अंमलबजावणी समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, भविष्यातही फॅक्टरीतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी, हिंदीला देशाचा अभिमान मानून, गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने जारी केलेल्या वार्षिक कार्यक्रमात निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार राजभाषा धोरणाचे पूर्ण पालन करून हिंदीचा वापर करण्यास वचनबद्ध राहतील आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास आहे.