लोको पायलटचे उपोषण सुरु;-

भुसावळ : रेल्वे मंत्रालयाच्या दुर्लक्षी धोरणाचा निषेध करीत देशभरातील लोको पायलट्सनी २० फेब्रुवारीला सकाळी आठ वाजेपासून उपोषण सुरू केले आहे. २१ फेब्रुवारीला रात्री आठपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे. भुसावळ येथे हे ३६ तासांचे आंदोलन फलाट क्रमांक ४ वरील लोको पायलट कार्यालयाच्या समोर सुरू आहे.

लोको पायलट्सनी अनेक वर्षापासून आपल्या कामाच्या वेळेचा आणि विश्रांतीचा प्रश्न उपस्थित केला आहे. इतर रेल्वे कर्मचाऱ्यांना आठ तासांची शिफारस असताना, लोको पायलट्ससाठी ड्युटी वेळ ११ तासांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

विविध मागण्यांची पूर्तता करावी

रेल्वे अपघात रोखण्यासाठी उच्चाधिकार समितीने सलग रात्रीच्या ड्युटीची संख्या दोनपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, लोको पायल्टसन ३ तासांचे आंदोलन भुसावळ येथे सुरुसलग चार रात्री काम करावे लागते. परिणामी, होणाऱ्या अपघातांची शक्यता वाढली आहे. रेल्वेतील इतर कर्मचाऱ्यांना आठवड्यात किमान ३० तासांची विश्रांती मिळते, तर लोको पायल्टसना ती वेळ १४ तासांपर्यंत कमीकेली त्यांच्यासाठी मंजूर असलेल्या १,३२,००० पदांपैकी २२,००० पदे रिक्त आहेत, त्यामुळे कामाचा ताण अधिक वाढत आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार महागाई भत्ता ५० टक्के झाल्यानंतर सर्व भत्ते २५ टक्के वाढले; परंतु लोको पायल्टसचा मायलेज भत्ता मात्र वाढविलेला नाही .

फोटो संग्रहित